मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वैविध्यपूर्ण विषयांवर भाष्य करणारे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. विषयासोबतच चित्रपटांच्या आशयामध्येही विविधता दिसून येत आहे. समाजात आजही जात, रूढी, परंपरा, यांची मुळं खोलवर रुजलेली दिसतात. एकीकडे ‘जात’ या संकल्पनेचे समूळ उच्चाटन करण्याचे भाष्य करत असताना जातीपातीचे राजकारण खेळणारी सुशिक्षित माणसं सभोवताली वावरताना दिसतात. याच विचारधारेवर प्रकाश टाकणारा‘ताटवा’ हा नवा मराठी चित्रपट येत्या २६ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘शरयू आर्ट प्रोडक्शन’ निर्मित ‘ताटवा’ या चित्रपटाची निर्मिती डॉ. शरयू पाझारे यांनी केली असून दिग्दर्शन ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी केलं आहे.
‘प्रेम’ आणि ‘कला’ या दोन गोष्टी अशा आहेत की ज्यांना जातीचं बंधन कधीच अडवू शकत नाही. प्रेमाची आणि कलेची सांगड घालत ‘ताटवा’ या सिनेमाची कथा गुंफली आहे. या चित्रपटाची कथा शिल्पा या पाथरवट समाजातील मुलीच्या जीवनावर बेतलेली आहे. दगडाचे पाटे, वरवंटे, खेळणी विकून शिल्पाचे कुटुंब उदरनिर्वाह करत असते. एका अनपेक्षित क्षणी लिखितचा तिच्या आयुष्यात प्रवेश होतो. व त्यानंतर त्यांची प्रेमकहाणी कोणत्या वळणावर येऊन थांबते? जातीवादाचे चटके सोसून शिल्पा येणाऱ्या समस्यांवर कशी मात करते? हे पाहण्यासाठी २६ मे ला चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पहावी लागेल. संजय शेजवळ आणि गौरी कोंगे ही नवी जोडी ‘ताटवा’ चित्रपटातून पदार्पण करत आहे. सोबत अरुण नलावडे, डॉ. शरयू पाझारे, देवेंद्र दोडके, डॉ. सरिता घरडे, विक्रांत बोरकर, नूतन धवणे, शीतल राऊत, सदानंद बोरकर, कमलाकर बोरकर, मंजुषा जोशी व बालकलाकार गौरी यांच्या भूमिका आहेत.
कला आणि प्रेम यासोबतच समाजातील विषमतेवर भाष्य करणाऱ्या शरयू आर्ट प्रोडक्शन निर्मित ‘ताटवा’ या चित्रपटाची निर्मिती डॉ. शरयू पाझारे यांची असून दिग्दर्शन अरुण नलावडे यांनी केलं आहे. सहनिर्मिती विशाल रामटेके व स.कोंडबत्तुलवार यांनी केली आहे. विवेक कांबळे हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. चित्रपटाची कथा एम. कंठाळे यांनी लिहिली असून संवाद डॉ. शरयू पाझारे, डॉ. सरिता घरडे, सुरेश कांबळे, शैलेश ठावरे, यांनी लिहिले आहेत. ज्येष्ठ छायाचित्रकार इम्तियाज बारगीर यांनी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली असून संकलनाचे काम बी.म्हन्तेश्वर आणि रोहन सरोदे यांनी केले आहे. नाट्यलेखक व चित्रकार सदानंद बोरकर यांनी चित्रपटाचे कला दिग्दर्शक म्हणून काम पहिले आहे. श्रीपाद भोळे लिखित या चित्रपटातील गीतांना संगीतकार अतुल जोशी, प्रशांत फासगे यांनी संगीत दिले असून गायक केवल वाळंज, सावनी रवींद्र, योगिता गोडबोले, अतुल जोशी, प्रसाद शुक्ल यांनी ती गायली आहेत.
२६ मे ला ‘ताटवा’ चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
‘TATVA’
In recent times, Marathi Cinema’s handling of varied topics has earned the approval of cinegoers. Along with the subject there is a freshness in the intent of the movie. Even today the roots of caste, customs and tradition run deep. On one hand we talk of completely uprooting casteism, and on the other hand we see around us educated people playing caste politics. The movie ‘Tatva’,commenting on this kind of thinking, is being released on the 26th of May. Sharayu Art Production’s ‘Tatva’, is produced by Dr. Sharayu Pazare and directed by Veteran actor Arun Nalawade.
‘Love’ and ‘Art’ are two such things that cannot be bound by the shackles of caste. The story of ‘Tatva’ is the combination of love and art. The story is based on the life of Shilpa belonging to the Paatharvat community. Shilpa’s family makes a living by selling stone grinders and toys. At an unexpected moment Likhit enters her life. At what turning point does her love story comes to a halt? How Shilpa overcomes the various obstacles of casteism? To know the answers we have to wait till the release on 26th May. A new pair comprising of Sanjay Shejwal and Gauri Konge make their debut in ‘Tatva’. The other artistes are Arun Nalawde, Dr. Sharayu Pazhare, Devendra Dhodke, Dr. Sarita Gharde, Vikrant Borkar, Nutan Dhavne, Sheetal Raut, Sadanand Borkar, Kamlakar Borkar, Manjusha Joshi and child artiste Gauri.
Along with love and art, the movie commenting on the abnormalities of society, the Sharayu Art’s ‘Tatva’ is produced by Dr. Sharayu Pazare and directed by Arun Nalawade. It is co-produced by Vishal Ramteke and S.Kondbatulwar. Vivek Kamble is the executive producer. The story is written by M. Kantale and the dialogues are by Dr. Sharayu Pazare, Dr. Sarita Gharde, Suresh Kamble and Shailesh Thavre. Senior cinematographer Imtiaz Bargir has taken care of the Cinematography and the editing is done by B. Mhanteshwar and Rohan Sarode. Sadanand Borkar has done the art direction. Lyrics written by Shripad Bhole are set to music by music directors Atul Joshi and Prashant Phasge, and sung by Keval Valanj, Savani Ravindra, Yogita Godbole, Atul Joshi, and Prasad Shukla.
‘Tatva’ will be released in theatres on the 26th May.